..ठरलं! वसंत मोरे पुन्हा ‘जय महाराष्ट्र’ ९जुलैला बोलणारं; प्रवेशाअगोदरच पुणे शहरातील या मतदारसंघावर केला दावा

0

मुंबई- वसंत मोरे हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहेत. वसंत मोरे यांनी आज उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. वसंत मोरे ९ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे वंचितचा साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून विधानसभा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना यांसदर्भात माहिती देताना सांगितलं की, वसंत मोरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती.

अधिक वाचा  वारं फिरलं, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची धुव्वादार बॅटिंग, IMD चा अलर्ट; विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

सूत्रांच्या माहितीनुसार, हडपसर किंवा खडकवासला या विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदारकीचं तिकीट मिळू शकते. वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभेची मागणी केली आहे. आज मोरे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे. वसंत मोरे यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. मात्र, तरी त्यांचा पराभव झाला होता. आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, वसंत मोरे आमच्याकडे येत आहेत.

अधिक वाचा  राज्यात ‘अर्णब’ चक्रीवादळामुळं पाच दिवस पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट; गडचिरोली मुसळधारेचा इशारा