सुप्रिया सुळेंचा विजय रोखणार? भाजपची खास आमदारावर जबाबदारी; सर्व 48 नियुक्त्या जाहीर

0

लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे. पण आतापासूनच सर्वच पक्षाकडून राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने आता आमदार राहुल कुल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये आमदार राहुल कुल यांना बारामती लोकसभा मतदासंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वतीने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी कमी कालावधीतही कांचन कुल यांनी पवारांना मतदासंघांत रोखण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळेच आगामी बारामती लोकसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभेचा उमेदवार निवडण्यात आमदार कुल यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

मनसेच्या नेत्याला प्रवेशाआधीच जबाबदारी चंद्रपुरात भाजपची मोठी खेळी

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. वरोरा विधानसभा क्षेत्रात मनसेच्या तिकिटावर 2019 ची निवडणूक लढलेले रमेश राजूरकर यांना भाजपच्या वतीने विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 13 जून रोजी राजूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या विधानसभा प्रमुखांच्या यादीत रमेश राजुरकर यांचे नाव आहे. सप्टेंबर 2022 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बदललेली राजकीय समीकरणे बघता भाजपने नवा डाव टाकल्याचे चित्र आहे. याच क्षेत्रातून दिवंगत खासदार यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आमदार आहेत. प्रत्येक विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने आपली रणनीती आखली आहे.

अधिक वाचा  वारं फिरलं, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची धुव्वादार बॅटिंग, IMD चा अलर्ट; विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत